इ. स. १९६६ 

जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मीय अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचे चिरंजीव प्रख्यात गणिततज्ज्ञ, इतिहासकार, बहुभाषिक, भारत विद्या पंडित दामोदर यांचा जन्म. ३१ जुलै, १९०७ रोजी गोव्यात कुसंबे या गावी झाला. दामोदरांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. पुढे १९१९ च्या सुमारास अमेरिकेच्या हावर्ड विद्यापीठाणे त्यांच्या वडिलांना आमंत्रण दिले. वडिलांसोबत दामोदरही अमेरिकेत गेले. तेथील केंब्रिज लॅटिन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अविश्रांत परिश्रम घेऊन हावर्ड विद्यापीठातुन त्यांनी गणित, भाषा व इतिहास या विषयांत पदवी संपादन केली. भारतात परतल्यावर त्यांनी काही काळ बनारस, अलिगढ येथे प्राध्यापकी केल्यावर पुण्याच्या फग्युसन महाविद्यालयात १४ वर्ष काम केल्यावरही नशिबी गणिताचा वनवासच लाभला. कारण गणिताचे उत्तम प्राध्यापक म्हणून ते कधीच गणले गेले नाहीत. पण एक संशोधक  म्हणून त्यांना मान्यता मिळाली. 

आधुनिक भारतीय गणितज्ज्ञांत कोसंबींचा समावेश होतो. १९३४ साली ' राजानुजम मेमोरियल पारितोषिक ' या गणितातल्या प्रतिष्ठित पुरस्काराने ते सन्मानित झाले. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईच्या नामांकित संस्थेत त्यांची गणित विभागाच्या प्रमुखपदी निवड केली. हावर्ड विद्यापीठाने त्यांना गणितज्ञ व संख्याशास्त्रज्ञ म्हणून व्याख्याने देण्यासाठी खास बोलावले होते. ब्रिटिश कौन्सिल या जगविख्यात संस्थेने त्यांना गणिताच्या व्याख्यानासाठी बोलावले होते. याशिवाय युरोपात अनेक ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून गणितावर व्याख्याने दिली. एकंदरीत आधुनिक गणितात त्यांचे फार मोठे योगदान आहे. तथापि, गणितापेक्षा इतिहासाच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. 

भारताच्या ऐतिहासिक, प्राचीन परंपरेचा त्यांना अभिमान होता. त्यामुळेच त्यांना इतिहासाच्या आवड निर्माण झाली. त्यांच्या इतिहासलेखनावर मार्कसचा प्रभाव जाणवतो . इतिहास म्हणजे संस्कृतीच्या  उदयास्ताचा आलेख मानून डॉ. कोसंबी भारतीय संस्कृतीचा आलेख रेखाटतात. मॉस्कोमध्ये त्यांनी भारतीय इतिहासाच्या अभ्यासपद्धतीवर व्याख्याने दिली. रूमानिया आणि पूर्व युरोपातील देशांनाही त्यांनी भारतीय इतिहासावर व्याख्याने दिली. 

नाणकशास्त्र हे शास्त्र आहे, हे त्यांनी गणिती पद्धतीने असंख्य नाण्यांच्या अभ्यासावरून सिद्ध करून भारतीयांनी दुर्लक्ष केलेल्या नाण्याच्या अभ्यासाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. नाण्यांच्या वजनाच्या संदर्भात ' स्टँटिस्टिकल ' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. याशिवाय त्यांच्याकडे सूक्ष्म पाषाण आयुधांचा मोठा संग्रह होता. पाली व संस्कृत भाषेचाही त्यांनी अभ्यास केला होता. ब्राम्ही लिपीचा शोध घेऊन त्यांनी पूर्वाष्म  संस्कृतीच्या अनेक अवशेषांचा शोध घेतला. एकंदरीत पुरातत्व विद्येतही त्यांनी सर्वात्तम ज्ञान प्राप्त केले होते. भारतीय इतिहासातील दंतकथांचा वास्तव शोध घेणारा ग्रंथही त्यांनी लिहिला. याशिवाय १४४ शोधनिबंध व स्फुटलेख लिहिले. इंडोयुरोपियन लोकांमध्ये राष्ट्रीय गुणवैशिष्ट्यांचा उद्भव केव्हा आणि कसा झाला, याचा शोध घेणारा त्यांचा लेख चंगलाच गाजला. एक जागतिक दर्जाचा ख्यातनाम इतिहासकार म्हणून त्यांची ख्याती होती. 

डॉ. कोसंबी यांनी जे यश संपादन केले ते विशेषतः भारत पारतंत्र्यात असताना. स्वतंत्र भारतात १९५९ साली ते टाटा इन्स्टिट्यूट तर्फ चिनी शासकीय संबोधन केंद्रात तांत्रिक सल्लागार म्हणून गेले. या भेटीत त्यांना चौ- एन - लाय यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. पण हा शिष्टाचार  फलदायी ठरला नाही. कारण चीनने अखेर भारतात आक्रमण केलेच. अमेरिकेच्या भेटीत जगविख्यात आइनस्टाईन या शास्त्रज्ञांनी चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली. 

आपल्या अखेरच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचा आढावा घेतला. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करीत असताना झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा देह २९ जुलै, १९६६ रोजी पंचत्त्वात विलीन झाला.   

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.