सातारा

      हिंदी राज्य नाटय (हौशी) स्पर्धा 2019 च्या अंतिम फेरीत अभिजित वाईकर यांना 'लागा चुनरी में दाग' या नाटकातील 'हरी शर्मा' या भूमिकेसाठी अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले. रशियन लेखक अँटोन चेकोव्ह यांच्या 'अ डेथ ऑफ गव्हर्नमेंट क्लार्क' या लघुकथेवरून अभिजित यांनीच लिहिलेल्या 'एके दिवशी काय झाले' या मराठी दोन अंकी नाटकाचा हिंदी अनुवाद राजेंद्र थिटे यांनी 'लागा चुनरी में दाग' या नावाने केला. स्पर्धेत पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षक व परीक्षकांनी या नाटकाला उत्तम दाद दिली. या नाटकातील कॉमन मॅन अभिजित यांनी शब्दशः रंगवला व बक्षीस पटकावले.  बक्षीस समारंभ 21 जुलै 2019 रोजी सकाळी 10 पासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह , कोल्हापूर येथे पार पडला. 3 तास रंगलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित या कार्यक्रमात मराठी हौशी, मराठी व्यावसायिक, हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग नाटय स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवलेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्य च्या संचालिका मीनल जोगळेकर, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,  सांस्कृतिक चे अधिकारी मच्छिन्द्र पाटील यांच्या  उपस्थितीत , समन्वयक प्रशांत जोशी यांच्या संयोजनात हा सोहळा पार पडला. ज्येष्ठ चित्रपट, नाटय दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते व रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, अभिनेते अविनाश नारकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, डॉ. शरद भुताडीया, प्रमोद पवार, भालचंद्र कुलकर्णी, पवन खेबुडकर, संजय हळदीकर इत्यादी कलावंतांच्या उपस्थितीत विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. अभिजित वाईकर यांना पवन खेबुडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  या कार्यक्रमात घाशीराम कोतवाल, विच्छा माझी पुरी करा इत्यादी नाटकातील प्रवेश सादर करण्यात आले. तसेच पू.ल. देशपांडे यांची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.अंतिम फेरी ची पारितोषिके वितरित होणार असल्याने सर्व महाराष्ट्र्रातुन नाटय कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.  

       अभिजित यांना हौशी मराठी नाटय स्पर्धेसाठी याआधी 2 अभिनय गुणवत्ता पुरस्कार मिळालेले आहेत. याआधी 2012 साली त्यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या 'नजरकैद' मधील 'जॉय डिसुझा' साठी तर 2014 साली त्यांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या 'एके दिवशी काय झाले' या नाटकातील 'ह. ना.' या भूमिकेसाठी  मराठीतील नाटकांचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेली आहेत. हिंदीत पहिल्यांदा पुरस्कार मिळाला आहे. साताऱ्यातून हिंदीत मिळालेल्या या पुरस्काराचे अजून एक विशेष हे आहे की जवळपास 60 हिंदी नाटकातून जे 10 पुरुष अभिनेते निवडले गेले त्यात अभिजित वाईकर यांचा समावेश झाला. व साताऱ्यात हिंदी नाटकासाठी पुरस्कार आला ही सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. "हा पुरस्कार मी प्रोत्साहन स्वरूपात स्वीकारत असून  लवकरच एका नव्या नाटय निर्मितीची सुरुवात करेन. या पुरस्कार प्राप्तीनंतर माझ्या सर्व मित्रांनी, विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी आणि हितचिंतकांनी जो माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्याबद्दल सर्वांचा मी आभारी असून तुमच्या शुभेच्छा नक्किच सार्थकी लावेन आणि या क्षेत्रात अजून भरीव कामगिरी करेन." असे मनोगत अभिजित यांनी व्यक्त केले. या नाटकात अभिजित वाईकर यांच्या सोबत शिल्पा वाईकर, संजीव आरेकर, उदय टंकसाली, सुनील स्वामी, तृप्ती शाह-गुजर, डॉ. प्रिया भोईटे, अतुल नानोटकर, तन्मय राजे, प्रतीक पवार, कुमार डोईफोडे, शलाका लाहोटी, सुनंदा वाईकर, किशोरी क्षीरसागर, सबनीस आढाव, वनराज कुमकर, मयुरेश आरेकर, वैष्णवी आरेकर, करिष्मा शिकलगार, बलराम कलबुर्गी, मधूमिता वाईकर इ. कलावंत होते. अभिजित यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय मराठी नाटय परिषद सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, ज्येष्ठ अभिनेते रमेश कदम, राजेंद्र थिटे, पत्रकार चंद्रकांत देवरुखकर, नंदा निकम, सौ. शिल्पा चिटणीस, गुलाब पठाण, प्रदीप लोहार, यश शिलवंत ,चित्रकार शेखर हसबनिस, अशोक उत्तेकर, महेंद्र पवार, अभय देवरे, पदमनाभ जोशी, पूजा कदम, प्राजक्ता चव्हाण, अमेय पंडत, सुनील स्वामी इत्यादी मधूमिता कला अकादमीचे कलाकार व नाटय वर्तुळातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.