महाड-दि.२१ जुलै 

      मुंबई गोवा महामार्गावरील वेंâबुर्ली गावाच्या हद्दींत मागिल महिन्यांमध्ये रसायनची वाहातुक करणाNया ट्रकचा अपघात झाला होता.अपघाता मुळे ट्रक मधुन नेण्यांत येणारे गंधक रसायन साफ करण्यांत आले नव्हते.रस्त्या लगत पसरलेल्या गंधकाचा अचानक भडका उडाल्यामुळे वाहान चालकांमध्ये घबरहाट झाली,त्या नंतर पोलिस प्रशासनाचे लक्ष गेले.मात्र गेल्या एक महिन्या पासुन महामार्गा लगत सांडलेल्या गंधका कडे स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केलेâ

      महामार्गावरील वेंâबुर्ली या गावाच्या हद्दींत मागिल महिन्याच्या २२ तारखेला एका ट्रकला अपघात झाला होता.या अपघाता मध्ये दोनजण जखमी झाले होते.ट्रकच्या अपघाता मुळे ट्रक मधील गंधक रसायन रस्त्यावर सांडले होते.या घटनेला एक महिना झाला तरीही संबधीत ट्रक मालक,वंâपनी त्याच बरोबर स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नाही.आज रविवारी सकाळी अचानक झांडलेल्या गंधकाचा भडका उडाल्या नंतर प्रशासनाला जाग आली.नदी आणि महामार्ग या मध्ये गंधक सांडल्याने नदीतील पाण्यावर देखिल त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यांत येत असुन त्या मुळे नदीतील पाणी देखिल दुषित होण्याची शक्यता आहे.गंधर सांडल्या नंतर साफसफाई करणे आवश्यक आहे परंतु त्या रसायनाची माहिती स्थानिक प्रशासनालाच नसल्याने गंधकाची स्वच्छता करण्यांत आली नसल्याचे वेंâबुर्ली ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

      आज सकाळी गंधक ज्या जागेमध्ये पसरले होते त्या जागेंतुन सुरवातीला धुर येण्यास सुरवात झाली.त्या नंतर गंधकाचा भडका उडाला.त्वरीत अग्निशामकदलाला पाचारण करण्यांत आले आणि आग नियंत्रणा मध्ये आणण्यात यश आले.घटनास्थळी नायब तहसिलदार अरविंद घेमुड यांनी भेट दिली.सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणातीही जीवीत अथवा वित्त हानी झाली नाही.

अवश्य वाचा