नेरळ 

         प्रत्येक वर्षी आगरी समाज संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षीही रविवार दि. 21 जुलै रोजी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे होते.  या कार्यक्रमात आगरी समाजातील तसेच इतर समाजातील दहावी आणि बारावीमध्ये प्रथम तसेच 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि इतर क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी संघटनेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

     कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळयाचे आयोजन नेरळ -बोपेले येथील आगरी समाज सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष पाटील यांनी केले तर इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी आगरी समाजाचा इतिहास आणि ओळख सांगून समाजाविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगरी समाज हा स्रियांचा सन्मान करणार समाजअसून आगरी समाज कधीही लग्नात हुंडा घेत नाही, असे अनेक प्रकारे मार्गदर्शन केले तर संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव आणि महाराष्ट्रात एमपीएससी मध्ये प्रथम आलेल्या रोहन कराळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्वतोपरी सहकार्य ,मार्गदर्शन करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.

      यावेळी इयत्ता दहावी, आणि बारावी मध्ये कर्जत तालुक्यातुन विविध शाळांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच विशेष म्हणजे इतर समाजातील कर्जत तालुक्यातुन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातुन प्रथम आलेले तसेच  महाराष्ट्रातून शास्त्रीय संगीत, , कुस्ती, वकृत्व, बीएचएमएस, बीएसइ, एमइ मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

      यामध्ये एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातुन प्रथम आलेले बेकरे गावातील रोहन कराळे, नेरळ विद्यामंदिर मधील- चरणदास पाटील, अभिनव ज्ञानमंदिर- तन्मय तुरे, यादवराव तासगवकर विद्यालय चांदई- प्रेरणा भुंडेरे, बोंबे हायस्कुल कर्जत- प्रतीक माळी, भाऊसाहेब राऊत विद्यालय कशेले-विवेक धुळे, शारदा विद्यामंदीर कर्जत- वरद पेमारे, भाऊसाहेब राऊत विद्यालय चिंचवली-चेतना ठाणगे, माथेरान व्हॅली वंजारपाडा- जानव्ही मोरगे, श्रमजीवी जनता विद्या मंदिर पोशीर- दीक्षा राणे, कै. कोंडीराम शेंडे भडवल विद्यालय-नम्रता विद्यालय, दत्ता सामंत विद्यालय वाकस- 

धीरज कडवं,एलएईएस विद्यालय नेरळ-सुयोग भगत, ओंकार विद्यालय शेलू- हर्षाला डांगरे, जनता विद्यालय कर्जत- कोमल तरे, गौळवाडी माध्यमिक विद्यालय- अनिकेत बार्शी, माथेरान सरस्वती विद्यालय- जानवी पाटील, न्यु इंग्लिश स्कुल पाषाणे-युवराज एनकर, गजानन विद्यालय कडाव-अनिकेत माळी, पीएमपी विद्यालय खांडस- विशाखा एनकर प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब-सुरज वेहले अशा अनेक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

      यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच कार्यकारीचे सदस्य, इतर सदस्यांनी आणि आगरी समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवर, विद्यार्थी, पालक व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

अवश्य वाचा