उरण 

वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम सध्या उरणकरांवर होताना दिसत आहे. ताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी उरणकरांना वेढा घातला असून, तापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असल्याचे चित्र आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उरणात दमदार हजेरी लावली. पावसापाठोपाठ दबा धरून बसलेल्या विविध आजारांनी देखील उरणकरांना ग्रासले आहे. यामध्ये सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी यांसोबतच तापाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अगदी छोट्या क्लिनिकपासून मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची रिघ पाहायला मिळत आहे. 
बदलत्या तापमानाचा माणसाच्या शरीरावर परिणाम होऊन विविध आजार बळावत असल्याचे डॉक्टर सांगतात. यामध्ये व्हायरल तापासोबत मलेरिया आणि डेंग्यू, स्वाइन फ्लू, टायफॉईड तसंच हेपेटायटिस या गंभीर आजारांच्या रुग्णांचा सामावेश आहे. विविध रुग्णांमध्ये सारखीच लक्षणे दिसत नाहीत. यामध्ये रुग्णांना ताप नसतो, मात्र घशाची समस्या आणि श्‍वास घेण्यासंबंधी त्रास जाणवतो. सध्या खाजगीसोबतच सरकारी रुग्णालयांमध्येही देखील तापासह अनेक आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत. फक्त प्रौढ व्यक्ती नव्हे तर लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे. सतत बदलणार्‍या वातावरणात शक्यतो बाहेरील खाद्यपदार्थांसह शीतपेय देखील टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. तसेच ताप किंवा सर्दी जास्त असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, जेणेकरून इतरांना आजारांची लागण होणार नाही. 

अवश्य वाचा