कोर्लई, ता.२१

मुरुड नगरपरिषद शाळांचे केंद्रप्रमुख सुधीर नागे शिक्षक ते केंद्रप्रमुख पदी राहून आपली ३८ वर्षे उत्तम प्रकारे सेवा करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. नगरपरिषद शाळा क्रमांक ४ मध्ये त्यांचा सेवापुर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
    यावेळी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, माजी केंद्रप्रमुख नांदगांवकर, संघटनेचे माजी अध्यक्ष फईमगुरुजी,नवनिर्वाचित केंद्रप्रमुख अनघा चौलकर,माजी मुख्याध्यापिका वैशाली कासार, आशालता बाक्कर, मनीषा फाटक,मंदाकिनी नांदगांवकर, शैला मसाल, फईममँडम,मसालगुरुजी,राकेश कौलकर,, राजेश्री गजने,कल्पना पेणकर, मंगला मुनेकर,निलांबरी भगत, अविनाश ठाकूर यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
    मुरुड नगरपरिषदेत शिक्षक ते केंद्रप्रमुख पदी शैक्षणिक क्षेत्रात सुधीर नागे यांनी उत्तमप्रकारे केलेल्या कार्याचा लेखाजोखा सायली गुंजाळ यांनी आपल्या सुत्रसचालनात मांडला व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान असल्याचे सांगीतले.
   माजी मुख्याध्यापक नारायण नांदगांवकर, नैनिता कर्णिक, उषा खोत,अंजूम सैय्यद,उत्कर्षा रणदिवे, प्रमोद सुभेदार, महेंद्र हावरे, मुख्याध्यापक राजेश भोईर, अमिता भगत आदीं.नी नागेगरुजींचा मनमिळावू प्रेमळ स्वभाव, सहकार्याची भावना व जिद्द याबद्दल आपले विचार मांडले व जीवनात यशस्वी होण्यासाठी सौभाग्यवतीची साथ लाभल्याचे सांगितले.यावेळी शिक्षक संघटना, माजी सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षिका यांच्या तर्फे सुधीर नागे यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ तर प्रमोद सुभेदार, राकेश कौलकर यांनी भेट वस्तू व दिपालीमँडम यांनी पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर यांनी विद्यार्थीनीच्या हस्ते गुरुंचा सत्कार होत असल्याचे नमूद करुन सुधीर नागे यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गुंजाळ तर चौलकर मँडम यांनी आभार मानले.

अवश्य वाचा