गोवे-कोलाड 

      रायगड जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात पाऊस उशिरा सुरु झाला असला तरी एक महिन्यापासून पाऊस चांगला झाला व सर्व नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या याच प्रमाणे रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी ही दुथडी भरुन वाहू लागली याच पुराचा फायदा घेत धाटाव येथील रासायनिक कंपन्यानी आपले केमिकल युक्त सांड पाणी कुंडलिका नदीच्या पात्रात सोडले असुन हे पाणी आजुबाजुच्या शेतीत घुसल्यामुले या पाण्यामुळे येथील नागरिकांना त्वचेच्या आजाराला सामोरे जावे लागत असुन येथील नागरिक खाज सुटत असल्याने हैराण आहेत.

       रोहा तालुक्यातील धाटाव एम आय डिसितील रासायनिक कारखान्यातील बाहेर पडणारे केमिकल्स युक्त सांडपाणी वारंवार कुंडलिका नदीत सोडले जाते या प्रदूषित पाण्यामुळे कधी शेतीचे नुकसान तर कधी मासे मेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.वृत्तपात्रातून या संदर्भात आलेल्या बातम्यांनंतर प्रदुषण मंडळाकडुन थातुर-मातुर कार्यवाही केली जाते.परंतू काही कालावधीनंतर कंपनीकडून पुन्हा प्रदूषणाचा नंगा नाच सुरु असतो.

      या महिन्याच्या सुरवाती पासुन पाऊस जोरदार पडलेल्या पावसामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वहात आहे.या नदीत सोडण्यात येणारे केमिकल युक्त पाणी शेतीत जाऊन शेतीचे नुकसान होत असल्याने येथील शेतकऱ्याकडुन संबंधित कंपन्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

अवश्य वाचा