मोहोपाडा

    श्री समर्थ सामाजिक संस्थे अंतर्गत रसायनी परिसरातील एड्स आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणात रहावे या उद्देशाने एड्स समुपदेशन व आधार केंद्र गेली दहा वर्ष एच ओ सी गेस्ट हाऊस येथील कंपनीच्या बंगला न.सी टी 4 येथे सुरु आहे.रसायनी प्रमाणे कर्जत,खालापुर,पनवेल,उरण अशा चार तालुक्यातील शेकडो एड्स रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करुण त्यांना ओषधोपचार देण्याचे महान कार्य संस्था करत आहे.या आजारासंबंधी समाजात आज ही कलंकित दृष्टिकोण असल्याने रुग्णाला वालीत टाकले जाते अशा वेळी त्या रुग्णाची हेलसांड होऊन मृत्यु होउ नये याकरिता रुग्णाला या सेंटर मधे आधार देण्याचे मोलाचे कार्य होत आहे. कंपनी कडून 2010 साली ही जागा भाड़ेतत्वावर देण्यात आली होती ,आता पर्यंतचे संपूर्ण भाड़े भरण्यात आले आहे, कंपनीने सेंटर बंद करण्यासाठी कोणतेही लेखी नोटीस अद्याप दिलेली नाही .तरीही या जागी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत हे केंद्र सुरु ठेवण्याबाबत अनेक वेळा विनंती अर्ज करण्यात आले असुन केंद्र सरकार कड़े देखील जागे संबंधी पत्र व्यवहार सुरु आहेत शिवाय आमदार प्रशांत ठाकुर,आमदार मनोहर भोईर, आमदार सुरेशी लाड, महिला व बालकल्याण सभापती उमाताई मुंढे आदिंचे शिफारस पत्र व परिसरातील जनतेने  या जागतिक समस्या असलेल्या एड्स आजाराची जनजागृति सुरु राहावी व एड्स रुग्णाना आधार मिळावा या करिता ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा येथे ग्रामसभा ठराव केलेला आहे.

      हे सर्व पत्र व्यवहार सी एम डी भिड़े यांना देण्यात आले असताना देखील दिनांक 16/7/2019 रोजी कोणतीही नोटिस न देता 10 वर्ष सुरु असलेले हे एड्स समुपदेशन व आधार केंद्राला टाले लावून संस्थेचे बोर्ड उखडून टाकला.या आधी काही संस्थांना शैक्षणिक व्यवसाय करण्या करिता जागा देण्यात आली आहे परंतु आम्ही संस्थेचे पदाधिकारी कोणतेही मानधन न घेता निस्वार्थ  हे कार्य करत आहोत शिवाय आम्ही स्वता प्रकल्प ग्रस्त असुन देखील आम्हाला समाज कार्य करण्यासाठी मात्र हे अधिकारी विरोध करत आहेत.हे केंद्र बंद झाल्याने या आजाराचे प्रमाण जनजागृति अभावी नियंत्रणात न राहता वाढेल व वालित पडणाऱ्या रुग्नांचे खुप हाळ होतील तरी हे केन्द्र सुरु रहाणे ही काळाची गरज  असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी बोलताना सांगितले.

अवश्य वाचा