नेरळ

         राज्यात व देशभराताल विवीध जनसंघटनानी सतत केलेल्या लढाया, आंदोलने या मूळे मंजूर झालेल्या वनह्क् कायद्याला वाचवण्यासाठी व केन्द्र सरकारच्या आदीवासी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आदिवासी बांधव एकवटणार आहेत.  २२ जूलै रोजी जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन केले असून कर्जत खालापूर तालूक्यातील हजारो आदिवासी व जंगलवासी या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

          पिढ्यापिढ्या आदिवासी व जंगल वासियांवर झालेल्या अन्यायामुळे त्यांच्यावरील हा अन्याय रोखण्यासाठी म्हणून केन्द्र सरकारने २००६ साली वनहक्क कायदा लागू केला. या कायद्यामूळे काही भागात आदिवासींना फायदा झाला पंरतू या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामूळे अनेक भागात हा कायदा लागूच केला गेला नाही हे दुर्दैव आहे. कर्जत खालापूर तालूक्यासह जिल्ह्याभरात अनेक आदिवासीचे वनहक्काचे दावे फेटाळले गेले. जे आदिवासी जंगल जमीन कसतात पण त्यांना ग्रामपंचायत पातळीवर गहाळ केला गेला आहे अशा वहीवाट धारकांना जंगलातून हुसकावून लावले जात आहे.  असे असताना कायद्याची प्रभावी अंमल बजावणी करण्याऐवजी या कायद्याच्या हेतूलाच छेद देणारा ,घटना विरोधी, लोकशाही विरोधी धोरण सध्याचे केन्द्र व राज्य सरकार घेत आहे. या धोरणाचा निषेध नोंदवण्या साठी रायगड जिल्ह्यात आदीवासीच्या मूलभूत अधिकारासाठी लढणा-या जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने दिनांक २२ जूलै रोजी कर्जतच्या उपविभागीय महसूल कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे,

            केंद्र सरकारने ७ मार्च २०१९ रोजी भारतीय वन कायद्या मध्ये अनेक जन विरोधी व वनविरोधी सूधारण्या सूचवल्या आहेत. या सुधारणांमध्ये एक चतुर्थांश वन भागावर फाँरेस्ट विभागाची सता पूनर्स्थापित करणे, खाजगी कंपन्यांना जंगलाचे अधिकार देणे, वनधिकार्यांना बंदुका देणे, वनाचे गूऩ्हे सिध्द करण्यासाठी स्वतंञ जेल तयार करणे, गोळीबार करण्याचा व दोन लाखा पर्यत दंड वसूल करण्याचा अधिकार फाँरेस्ट अधिकाऱ्यांना देणे, वनहक्क कायद्यानूसार आदिवासीना मिळालेल्या जमीनी काढून घेणे, कोणत्याही वनक्षेञास राखीव वन घोषीत करणे, संयूक्त वनव्यवस्थापण समिती मजूबत करून वनहक्क कायद्याने मान्य केलेली वनहक्क समिती, ग्रामसभा व पैसा कायदा कमकूवत करणे अशा सूधारणा सूचवल्या आहेत. या सूधारणा लोकशाही विऱोधी व आदीवासी विरोधी आहेत. असेच या सुधारणांमुळे देशातील सर्वच जंगल खाजगी कंपण्याच्या घशात जाणार आहे.  या सरकारच्या धोरणा विऱोधात आदिवासी व जंगलवासीनी  देशभर आंदोलनांचे आयोजन केले आहे. तेव्हा कर्जत व खालापूर तालूक्यात २२ जुलै सोमवार रोजी हा एल्गार मोर्चा होणार असून कर्जत येथील आमराई मैदानातून सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा निघणार आहे.  यात हजारो वन हक्क धारक आदिवासी, बीगर अदिवासी सहभागी होणार आहेत अशी माहिती जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास