उरण

मुबंई महानगरपालिकेत कित्येक वर्षे मासळीचा व्यवसाय बांधवांना स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याविरोधात आज कोळी समाजाने कृष्णकुंजवर मनसेचे राज ठाकरे यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले. त्यांची बाजू ऐकूण घेत आपण दोन दिवसांत महापालिकेवर धडक देणार असल्याचे आश्वासन कोळी बांधवांना दिले.
     मुबंईतील क्रॉफर्ड मार्केटच्या मासे विक्रेत्यांना ऐरोली नाक्यावर स्थलांतराची नोटीस मुबंई महानगरपालिकेने बजावली आहे. येत्या 1 आगस्ट पासून हे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट या परिसरातुन हलवून ते ऐरोली या परिसरात स्थलांतरित करण्याची नोटीस बजावली आहे. वास्तविक त्यांची सोय मुबंईमध्येच करणे अपेक्षित असताना त्यांना थेट मुबंई बाहेर हटविण्याचा घाट  सत्ताधार्‍यांनी रचल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 
      गेली 40 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट वसलेले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे विक्री होतात. त्यावर तब्बल 10 लाख लोक अवलंबून असल्याचे कोळी बांधवांनी सांगितले. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाही  हा मार्केट थेट एरोलीत आणण्याचा घाट आहे.
     हा मार्केट हलविला तर आमचे आयुष्यच उध्वस्त होईल असे कोळी बांधव सांगतात. कारण आमचा दररोजचा ग्राहक हा इथलाच असून आम्ही तेथे गेलो तर उध्वस्त होऊन जगणे कठीण होईल अशी संतप्त भावना कोळी बांधव व्यक्त करीत आहेत. याचबरोबर हॉटेल, कंपन्यांचे कॅटिंग चालविणारे आमचे ग्राहक आहेत. तेच जर संपुष्टात येणार असेल तर आम्ही पैसा कमवून जगयचे कसे असा सवाल मासळी विक्रेते करीत आहेत. महापालिकेच्या एकतर्फी निर्णयामुळे या परिसरात सत्ताधार्‍यांविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
      या विषयाला वाचा फोडीत न्याय मिळण्यासाठी कोळी समाज बांधवांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडीत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राज ठाकरे यांनी बाजू ऐकून घेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन आपण महापालिकेवर धडक देणार असल्याचे कोळी बांधवांना आश्वासन दिले. त्याआधी काल आमदार मनोहर भोईर यांनी कमिशनरची भेट घेऊन योग्य तो मार्ग काढण्यास सांगितले आहे.कृष्णकुंजवर कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली संतोष पवार, किरण कोळी यांच्यासह कोळी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा