सातारा

वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा शासकीय रुग्णालय हस्तांतरित केल्यामुळे याचा फायदा रुग्णसेवेवरही होणार असून, नव्या दमाचे तब्बल शंभर डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यासाठी हातभार लावणार आहेत. एवढेच नव्हे तर खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर काही वर्षांतच सिव्हिलमध्ये बायपास सर्जरीपासून एमआरआयपर्यंत शस्त्रक्रिया होतील. त्यामुळे साहजिकच खासगी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होणार आहे.

अपुºया सोयी सुविधा आणि डॉक्टरांच्या मनुष्यबळाअभावी जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतानाच हे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात आले, त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हे रुग्णालय हस्तांतर झाल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये साडेचारशे कर्मचारी आहेत. त्यामध्ये केवळ ४५ डॉक्टर आहेत. मात्र, येत्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी तब्बल शंभर डॉक्टरांना सिव्हिलमध्ये रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. हे सर्व डॉक्टर प्रशिक्षणार्थी जरी असले तरी त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर करतील.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.