सातारा

पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची पदोन्नतीवर बदली  झाली असून, त्यांची नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजलक्ष्मी शिवणकर या गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा पोलीस दलात कार्यरत होत्या. त्यांनी कऱ्हाड येथेही काही वर्षे काम केले आहे. तसेच पोलीस मुख्यालयातील गृहविभागही त्यांनी सांभाळला आहे.

या काळात त्यांनी पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावला. पोलीस पब्लिक स्कूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी बाल संगोपणगृह सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सध्या त्या रजेवर असून, त्यांच्या जागी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे हे काम पाहत आहेत.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.