खोपोली लायन्स क्लब अध्यक्षपदाचा ४८ वा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक 10 जुलै 2019 रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात दीक्षा देण्यासाठी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 यA2 चे उप प्रांतपाल राकेश चौमल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.गेल्या काही वर्षात खोपोली लायन्स क्लब ची अध्यक्षपदाची धुरा तरुण सदस्यांच्या हाती दिली जात असून त्यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरी होताना दिसत असल्याने या वर्षीही लायन सुजित पडळकर याना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली  आहे. मावळते अध्यक्ष अल्पेश शाह यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. 

      खोपोली लायन्स क्लबचा  ४८ व पदग्रहण सोहळा लायन्स सर्व्हिस सेन्टर येथे पार पडला झाला. गेल्या काही वर्षात खोपोलीत  लायन्स क्लबची अध्यक्ष पदाची धुरा तरुण सदस्यांची हाती जात असून त्यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरी होताना दिसत आहे. मागील अध्यक्ष ऐन.डी.शाजी,प्रशांत साठे, सचिन बोरांना,खेमंत टेलर, कुमार साखरे,शेखर जांभळे, दिवेश राठोड, अलपेश शाह या तरुणांनी खोपोली लायन्स क्लबचे नाव सामाजिक क्षेत्रात खूप पुढे आणण्याचे काम केले. यावर्षीही लायन सुजित पडळकर या तरुणास या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. 

      सुजित पडवळकर व त्यांच्या या वर्षीच्या टीमला लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 यA2 चे उप प्रांतपाल राकेश चौमल यांनी लायन्सची दीक्षा देत शपथ  दिली व आपापली कार्ये समजावून सांगितली. त्यांनी मागील टीमचे कौतुक तर केलेच व आगामी काळात जोमाने काम करा असा सल्लाही दिला. तत्पूर्वी लायन दीपेंद्रसिंह बधोरिया यांनी सन 2018-19 मधील कार्याची माहिती दिली, तर मावळते अध्यक्ष लायन अल्पेश शाह यांनी सहकार्य केलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त केले,लायन सुजित पडवळकर यांच्या पदभार  समारंभास खोपोलीचे  लायन्स क्लबचे आजी-माजी  पदाधिकारी,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,पत्रकार व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या समारंभाचे औचित्य साधून यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, सावरोली, निर्माण फौंडेशन,खोपोली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साजगाव,सहजसेवा फौंडेशन, खोपोली यांना कॉम्प्युटर सिस्टिम व लॅपटॉपचे वाटप झमीनीच्या संस्थापिका मनीषा जांब यांच्या हस्ते करण्यात आले,प्रोजेक्ट चेअरमन पंकज शर्मा यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.. याचवेळी खोपोलीतील गरजू महिलांसाठी 3 शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले, लायन खेमंत टेलर यांनी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून विशेष सहकार्य केले..

   सन 2018-19 या वर्षात यशस्वी झालेल्या लायन्स परिवारातील विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात Lपआले. तसेच युथ exchange मध्ये इट्ली व जर्मनी येथे प्रस्थान करीत असलेल्या तानीया केजरीवाल, जिनय शाह,निशी ओसवाल यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

      लायन राकेश ओसवाल यांनी या महिन्यातील उपक्रमांचा आढावा घेतला तर लायन जितेंद्र परदेशी यांनी आभार  मानले. लायन शेखर जांभळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास