अलिबाग  

कोरानाच्या धसक्याने जिल्ह्यातील अनेक गावांनी गावबंदीचे केली. यासाठी काहीनी गावाच्या वेशीवर कुंपण घातले. तर काहीनी मोठ मोठे दगड ठेवून रस्ता बंद करुन ठेवला. गावकर्‍यानी घेतलेली ही भुमिका बेकायदेशीर असून, अशाप्रकारे बंद केलेले रस्ते गावकर्‍यांनी तात्काळ मोकळे करा असे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिले आहेत.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात संचारबंदी सुरु आहे. 15 दिवसांचा काळ मोठ्या शहरात राहण्याऐवजी अनेक चाकरमाण्यांनी गड्या आपला गाव बरा म्हणत गावचा रस्ता धरला. मात्र गावाला पोहचल्यानंतर वेशीवर गावात येण्यास प्रवेश बंद असल्याचे बोर्ड झळकत आहे. काही ठिकाणी कुंपण घालून रस्ते बंद केले आहेत तर काही ठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहे. वेशीतून आतमध्ये घुसू नये म्हणून तरुणांकडून पहारादेखील ठेवल्याच्या घटना घडल्या आहेत.

एकाच गावात जन्मलेेले असूनही गावबंदीमुळे ग्रामिण आणि शहरी असा वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसायला लागले होते. त्यामुळे रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी अशा प्रकारचे कृत्य खपवून घेणार असे म्हटले आहे. बंद केलेले रस्ते आधी मोकळे करा असे निर्देश त्यांनी सरपंच आणि पोलीस पाटील यांना दिले असून तसे न केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान कुठल्याही अफवांना बळी पडू नका, जिवनावश्यक वस्तु बाजारात उपलब्ध राहणार आहेत. फक्त नागरीकांनी गर्दी करु नये असे आवाहन पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा