नेरळ 

  कर्जत तालुक्यातील कळंब येथील गरुडपाडा गावात नवरा बायको यांच्या भांडणाला चुकीच्या माहितीच्या कोरोना कडे ओढले गेल्याने जमावबंदी आदेश मोडल्याने नेरळ पोलीस ठाण्यात एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आद्यदेश आणि संचारबंदी नुसार ही कारवाई करण्यात आली असून कोरोना बाबत चुकीची माहिती समाजमाध्यमात देणार्‍यावर प्रशासन कारवाई करताना दिसत आहे.

कळंब जवळील गरुडपाडा येथे असलेल्या भागा गोविंद बदे आणि सुरेखा भागा बदे यांची मुलगी अपर्णा ही जुन्नर येथे लग्नानंतर राहते.मात्र आपल्या नातेवाईकाचे निधन झाले म्हणून ती आपल्या माहेरी कळंब येथे घरी आली होती.मात्र दीड महिना झाला तरी आपली पत्नी घरी येत नाही म्हणून सुनील हरिभाऊ वरपे हे जुन्नर येथून 25 मार्च रोजी सकाळी कळंब येथे पोहचले. तेथे आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला आपण जुन्नर ला जाण्यासाठी निघू असे सांगत होता. मात्र अपर्णा या नवर्‍याचे काही ऐकून घेत नव्हत्या. त्यामुळे सुनील वरपे याने सासू सासरे आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यामुळे त्या तिघांनी सुनील वरपे यांना पकडून दोरीने बांधून ठेवले.ही माहिती स्थनिक महितीगार यांच्याकडून नेरळ येथे राहणारे खासगी वाहिनीचे पत्रकार यांना सांगितली. दुपारी बारा वाजता सदर पत्रकार हे कळंब गावात पोहचले आणि त्यांनी त्या स्थानिक मित्राला घेऊन गरुडपाडा गाव गाठले.तेथे भागा बदे यांच्या अंगणात एका व्यक्तीला बांधून ठेवले असल्याचे चित्रण केले आणि आपल्या खासगी वाहिनीवर दुपारी सव्वा दोन वाजता बातमी ब्रेक केली.त्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला दोरखंडाने बांधून ठेवले असल्याचा उल्लेख होता.

त्यानंतर प्रशासनाचे वतीने नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जी के भालचिम,सचिन सांगळे हे गरुडपाडा गावात पोहचले. तेथे पत्नी ला घेण्यास आलेल्या जावयाला बांधून ठेवले असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.त्या वेळी पोलिसांचे बरोबर कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक होते, त्या पथकाने त्या दोरीने बांधून ठेवलेल्या सुनील वरपे तसेच भागा बदे, सुरेखा बदे आणि अपर्णा वरपे यांची तपासणी करून घेतली असता कोणालाही कोरोना सदृश अशी लक्षणे आढळली नाहीत.

परंतु त्या खासगी वाहिनीवरील बातमी ने सर्वत्र खळबळ माजली होती.पोलीसांनी या घटनेची आणि त्या बातमी ची खातरजमा केली आणि बातमी चुकीच्या माहितीच्या आधारावर तयार केली आहे आणि संबंधित पत्रकाराने स्पर्धा करण्यासाठी ती बातमी कोरोना स्वरूप देत ब्रेक केल्याने बनवून व्हायरल केली,यातून समाजात भीतीचे वातावरण तयार झाले आणि आपल्या जिल्ह्यात कोरोना चा रुग्ण आहे असा समज होऊन सर्वत्र खळबळ माजण्यास ती चुकीची बातमी मदतीला आली होती.त्यामुळे रात्री नेरळ पोलीस ठाण्यात प्रशासनाचे वतीने चुकीच्या माहितीच्या आधारे बातमी बनविणारे पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.त्यात रायगड जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदीचा आदेश आणि राज्य सरकारच्या गृह विभागाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अध्यदेशनुसार लागू असलेली संचारबंदी यांचा भंग केल्याबद्दल भादवी कलम 188 अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे संचारबंदी काळात पत्रकारावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असून रायगड जिल्हयात समाज माध्यमात चुकीचे संदेश व्हायरल करणारे यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत.

 कोणत्याही बाबींची खात्री करावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना घराबाहेर पडणे आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याने हे कारवाई करण्यात आली आहे.यापुढे अधिक कठोरपणे प्रशासन संचारबंदी काळात कारवाई करणार असून कोणत्याही बाबतीत सर्वांनी खात्री करून घ्यावी आणि नंतर समाजमाध्यमे यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात.

 अविनाश पाटील-सहायक पोलिस निरीक्षक 

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा