अलिबाग 

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन गेली सत्तर वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात धावणारी सर्वसामान्यांची एसटी अर्थात लालपरी कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर आपापल्या डेपोत विसावल्यात खर्‍या,पण त्या गाड्या विसावल्याने जिल्ह्याचे अर्थचक्रच थांबल्याचे जाणवू लागले आहे.या कोरोना साथीमुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा एसटी विभागाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.हे अपरिमित नुकसान कसे भरुन काढले जाणार हाच सर्वाच मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे.

एसटीचे आणि सर्वसामान्य जनतेचे एक अतुट नातं आहे.गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी या सरकारी धोरणांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात एसटी पोहोचली आणि तिने एक विश्‍वासही निर्माण केला.त्यामुळे सर्वसामान्यांना एसटी ही आपली वाटू लागली आहे.दरवर्षी कोट्यवधी प्रवाशांची नेआणि करणारी ही लालपरी गेल्या 26 मार्चपासून आपापल्या डेपोत सक्तीची विश्रांती घेत आहे.दररोज लाखो किमीचा प्रवास करुन प्रवाशांना सुखरुपपणे इप्तिस स्थळी पोहोचविणार्‍या एसटीची चाके आता पूर्णपणे थांबली आहे.लॉकडाऊन संपतोय केव्हा आणि आपली चाके पुन्हा सुरु केव्हा होतात याकडेच या लालपरी मुकपणे पहाताना दिसत आहेत.

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा