मुंबई 

राज्यात करोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत 15 करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी मुंबई  येथे दिली. दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.

 डिस्चार्ज देण्यात आलेल्या 15 रुग्णांचे नमुने आधी पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता 14 दिवसानंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजुन पुढील 14 दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.     पुण्यात दोघा करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

 

अवश्य वाचा

मुंबईतील क्राइम रेट घटला.