श्रीवर्धन  

सध्या कोरोनाच्या भीतीने सर्वत्र घबराट पसरली असून कोकणातील अनेक चाकरमानी, विद्यार्थी यांची मुंबईत खाणावळी, हॉटेल्सही संचारबंदीमुळे बंद असल्याने फार वाईट परिस्थिती आहे. असे चाकरमानी, विद्यार्थी आता कोकणात आपापल्या गावी जाऊ इच्छितात. परंतु जिल्हा सीमाही बंद करण्यात आल्यामुळे त्यांना आपापल्या गावीही जाता येत नाही. त्यामुळे अशा अनेक चाकरमानी /विद्यार्थ्यांना प्रसंगी त्यांची मुंबईत कोरोना चाचणी करुनही त्यांना रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील आपापल्या गावी येण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती   खासदार  सुनिल तटकरे यांना काही मुंबईकर चाकरमान्यांनी पत्राद्वारे केली आहे.

 त्याच्या प्रती त्यांनी रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे व कोकण स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आ. अनिकेत तटकरे यांना पाठविल्या आहेत.  या विनंतीचा आ. अनिकेत तटकरे यांनी गांभीर्याने विचार करुन  े मुंबईकर चाकरमानी, विद्यार्थी यांना एकानिवेदनाद्वारे विनंती केली आहे की, प्राप्त परिस्थितीत शासनाने खबरदारीचे उपाय म्हणून काही निर्बःध घातलेअसल्यामुळे येत्या दोन दिवस तरी आपण आहात तिथेच थांबण्याचे आवाहन मी करतो. थोडे कष्ट, त्रास सहन करावा लागेल. परंतु आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तेमहत्वाचे आहे परंतु आपली मागणी मी मा. मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाकडे मांडून योग्य ती उपाययोजना करणेसंदर्भात विनंती करुन आपला प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच मुंबई मध्ये थांबलेल्या बांधवांना रेशन संदर्भात काही व्यवस्था करायची असेल तर ती आपल्या स्तरावर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी आपण आपला संपर्क किंवा गरजवंतांची नावे दिली तर मुंबईत आपल्याला त्यांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करता येतील त्यामुळे भयभीत त न होता आपण आहात तिथेच राहून स्वतःची काळजी घेऊ या.

 

अवश्य वाचा