खोपोली 

संचारबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये यासाठी खोपोली नगरपालिकेने भाजी मार्केटमधील गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक विभागात भाजी विक्रेत्यांची व्यवस्था केली असून भाजी खरेदीसाठी येणारे नागरिक स्वत :ची काळजी घेण्यासाठी तोंडाला माक्क्स न लावणे तसेच गर्दी करून  जिल्हाधिकारी यांंच्या आदेशाचे अवमान करणे या कायद्यानुसार खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकार डॉ.रणजीत पाटील यांनी तीन महिला व तीन पुरुषांवर कायदेशीर कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खोपोली शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेत नगराध्यक्षा सुमन औसरमल,मुख्याधिकारी यांनी नगरसेवक व समाजसेवक यांच्या सहकार्याने शहरातील सर्व प्रभात भाजी विक्रेत्यांना बसविले असताना पंत पाटणकर चौकात भाजी खरेदीसाठीची गर्दी केली यावेळी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकार डॉ.रणजीत पाटील येथील व्यवस्था पाहण्यासाठी आले असता भाजी खरेदीसाठी आलेल्या एकत्रित महिला व तोंडाला माक्स न लावणे खरेदी झाल्यावर तेथे पाहत बसणे यांच्या जिल्हाधिकारी यांंच्या आदेशाचे अवमान करणे या कायद्यानुसार कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा