नवी दिल्ली  

भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला भारतीय संघाकडून बर्‍याच संधी मिळाल्या. पण या संधीचे सोने मात्र त्याला करता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूच्या मते पंतने स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी, पण त्याचवेळी कोणाचीही कॉपी करू नये, असे म्हटले आहे.

इंग्लंडमधील विश्‍वचषकात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला तळाच्या फळीत पाठवून पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. पण त्यामध्येही तो अपयशी ठरला. त्यापूर्वी आणि विश्‍वचषकानंतरही पंतला भारतीय संघाने बरीच संधी दिली. पण तो त्यामध्ये अपयशी ठरताना दिसला. संघाला गरज असताना आपली विकेट बहाल करताना पंत बर्‍याचडदा दिसला. त्यामुळेच सध्याच्या घडीला त्याचे भारतीय संघातील स्थान डळमळीत आहे.

गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा माजी महान यष्टीरक्षक आणि फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने पंतबाबत स्पष्ट वक्तव्य केले होते. गिलख्रिस्ट म्हणाला होता की,  पंतने महेंद्रसिंग धोनीची नक्कल करू नये. पंतकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यावर त्याने मेहनत घेतली तर तो जास्त काळ क्रिकेट खेळू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिननेही पंतबाबत म्हटले होते की,  पंत हा गुणी खेळाडू आहे. पण त्याने दुसर्‍याच कोणाची नक्कल न करता आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी.

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा