नवी दिल्ली  

करोनाच्या भीतीमुळे संपूर्ण देशभरात 21 दिवसांकरिता पूर्णपणे संचारबंदी करण्यात आल्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) रद्द करण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असताना इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आयपीएल खेळण्यासाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आताच्या क्षणाला मी इतकंच सांगू शकतो की आता मी नजीकच्या जी स्पर्धा खेळेन ती आयपीएल स्पर्धा असेल. आयपीएल रद्द होण्याची शक्यता असली तरीही मला खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार व्हावेच लागणार आहे. मला आतापासूनच तयारीला लागायला हवे आणि स्पर्धेत खेळण्याच्या दृष्टीने स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवायला हवे. मी 3 आठवडे गप्प बसून अचानक 20 एप्रिलला मैदानात खेळण्यासाठी उतरू शकत नाही. तसे कोणालाच जमणार नाही. कदाचित आयपीएल खेळली जाईल आणि तसे झाले तर मला मागे राहायचे नाहीये. आम्हाला अनेक प्रकारचे सल्ले देण्यात आले आहेत. त्यामुळे जर आयपीएलचे आयोजन करण्यात आले, तर मी नक्कीच योग्य तो निर्णय घेईन, असे स्टोक्सने सांगितले.

ङ्गबीसीसीआयफने काही दिवसांपूर्वीच आयपीएलचे आयोजन 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकले होते. करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले तरच आयपीएल स्पर्धा होणे शक्य होते. पण करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्यात आल्यानंतर सध्याची परिस्थिती आणखीनच खडतर होत चालली आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले. ङ्गङ्घमे महिन्यात करोनाची स्थिती जरी नियंत्रणात आली तर मैदानावर येऊन कोण खेळणार आहे? परदेशी खेळाडूंना भारतात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल का?,फफ असे सवाल पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी विचारले. त्यामुळे अद्याप तरी आयपीएल होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा