बांगलादेश  

करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकार्‍यांच्या अथक परिश्रमामुळे बहुतांश लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. करोनामुळे नुकसान झालेल्या लोकांसाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. या दरम्यान क्रिकेटपटूंनी आपल्या मानधनातील अर्धे मानधन करोनाग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेश क्रिकेट संघातील 27 क्रिकेटपटूंनी करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपले अर्धे मानधन दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार तमीम इकबाल, मुश्फीकूर रहीम या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. खेळाडूंनी अर्धे मानधन दान केल्याने एकूण मिळून 31 लाख रूपये जमा होणार आहेत. 

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा