कर्नाटक 

सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे अत्यंत भीतीचे वातावरण आहे. साधा सर्दी, खोकला झाला तरी अनेकांच्या मनता शंकेची पाल चुकचुकत आहे. याच भीतीपोटी आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, या समजातून एका व्यक्तीने आत्महत्या केली. कर्नाटकाच्या उडीपी जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मृत व्यक्ती कर्नाटक राज्य रस्ते परिवहन सेवेमध्ये प्रशिक्षक होता. बुधवारी सकाळी लवकर तो घरातून बाहेर पडला. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात झाटाला लटकून त्याने गळाफास घेतला. झाडाजवळ असलेल्या खिडकीमध्ये एक चिठ्ठी सापडली. आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भीती आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या, असे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिल्याचे पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

मृत व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची कुठलीही लक्षणे दिसली नव्हती, तसेच तो कुठल्या उपचारांसाठी डॉक्टरांकडेही जात नव्हता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. हा माणूस सातत्याने कोरोना व्हायरससंबंधी बातम्या पाहात होता. आपल्याला कोरोनाची लागण झालीय या भीतीने त्याच्या मनामध्ये घर केले होते. त्यामुळे तो निराश झाला होता, असे एका पोलीस अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. रविवारपासून तो खूपच घाबरला होता, असे मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट