वॉशिंग्टन 

अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढत असून, मागील पाच दिवसांत तब्बल दहा हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत कोरोना वेगाने फैलावत असल्याचे चित्र असून, चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या आजारामुळे बळींचीही संख्या वाढली असून, एक हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन सिनेट आणि व्हाइट हाऊसमध्ये 2000 अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर करण्याबाबत एकमत झाले आहे.

अमेरिकेतील सर्वच 50 राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 68 हजार 572 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळल्याच्या यादीत चीन, इटलीनंतर अमेरिका तिसर्‍या स्थानावर आहे. वॉशिंग्टन डीसी प्रशासनाने 24 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, कामकाजांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, आयोवा, लुसियाना, उत्तर कॅरोलिना, टेक्सास आणि फ्लोरीडा राज्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कसह अनेक राज्यांसाठींच्या मदतीला मंजुरी दिली आहे.

न्यूयॉर्क शहरात दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली असल्याचे चित्र आहे. न्यूयॉर्क शहर सध्या करोना संसर्गाचे केंद्र बनले आहे. मंगळवारपर्यंत न्यूयॉर्कमध्ये करोनाची बाधा झालेल्यांची संख्या तब्बल 30 हजारांहून अधिक झाली आहे. तर, 285 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय न्यू जर्सीमध्ये 4,402 रुग्ण आढळले आहेत. तर, 62 जणांचा मृ्त्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्येही जवळपास तीन हजार करोनाबाधित रुग्ण आढळले असून, 65 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट