दापोली 

शासनाच्या आदेशाचा अवमान करुन दुकान चालू ठेवत पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी हर्णै लोखंडी मोहल्ला येथील एकावर कारवाई केली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. 23 मार्च रोजी सायं. 7.30 वाजण्याच्या सुमारास भटाराम कानाजी देवासी याने रस्त्यालगत असलेले आपल्या मालकीचे भवानी स्वीट्स मार्ट उघडे ठेवून सहा ग्राहकांना स्वीट्स मार्ट पदार्थ विक्री करीत असताना पथकाला आढळून आला.

याप्रकरणी भटाराम देवासी याच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कमल 51ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हे.कॉ. मोहन कांबळे करीत आहेत.

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट