दापोली 

वणंद कांगणेवाडी येथील ओपन शेडमधून हिरोहोंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चोरीस गेल्याचे उघड झाले असून, अज्ञात चोरटयाचा तपास दापोली पोलीस घेत आहेत.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश गणू कांगणे, रा. वणंद कांगणेवाडी, ता. दापोली यांच्या मालकीच्या जागेत कांगणेवाडी येथे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या कडेला ओपन शेड बांधली आहे. या शेडमध्ये गुरुवार, दि. 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. आपली ग्रे सिल्व्हर रंगाची युनिकॉर्न ही दुचाकी क्र. एम.एच.01 एबी.2888 ही उभी करुन ठेवली होती. शुक्रवार, दि. 20 मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी गेले असता त्यांना त्यांची दुचाकी तेथे आढळून आली नाही. आजूबाजूला राहणार्‍या लोकांकडे चौकशी केली असता त्यांना ती मिळून आली नसल्याने त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी दापोली पोलीस अज्ञात चोरट्याचा तपास करीत आहेत.

 

 

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट