दापोली 

संपूर्ण राज्यामध्ये अग्रगण्य असणार्‍या व सातत्याने सामाजिक बांधिलकी जपणार्‍या दापोली अर्बन बँकेने कोरोना साथीमुळे ज्या कुटुंबांना एकवेळचे जेवण उपलब्ध होणार नाही, त्यांच्यासाठी आपल्या निधीतून शासनाला सहकार्याचा हात दिला असून, तसे पत्र बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी दापोलीच्या प्रांताधिकार्‍यांना दिले आहे.

सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून सध्या देशामध्ये थैमान घातलेल्या कोरोना साथीमुळे जी संचारबंदी जाहीर करावी लागली आहे, त्यामुळे अनेक कुटुंबांना मजुरीचे उत्पन्न मिळणार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. हे लक्षात घेऊन शासनाच्या बरोबरीनेच दापोली अर्बन बँकेनेदेखील आपल्या निधीतून आवश्यक त्या मदतीचा हात पुढे केला आहे.

 

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट