पाताळगंगा  

सध्या कोरोना जगभर थैमान घालत असल्यामुळे सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सध्या कोरोना सारखा विषाणू धुमाकूळ घालत असल्यामुळे ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव तसेच ग्रामसेवक निवृत्ती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणी कर्मचारी यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी ही जंतू नाशक फवारणी सुरु करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू पसरु नये शिवाय यामध्ये आपल्या परिसरातील व्यक्तींना लागण होवू नये यासाठी शासन विविध पातळीवर उपाय योजना सुरु असतांना ग्रामपंचायत नागरिकांमध्ये जागृती मोहीम राबवित आहे. आपल्या परिसरात येणारी व्यक्तीची चौकशी करण्यात येत असून. शिवाय त्यांस कोणताही आजार नाही ना ?तसेच असल्यास जवळच्या आरोग्य केंद्र किंवा ग्रामपंचायत शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना सारखा विषाणू यांनी उग्र रुप धारण केल्यामुळेच अनेक ठिकाणी बंद ची हाक पाहण्यास मिळत आहे.शिवाय ग्रामीण भागात त्यांचे चांगल्या प्रकारे पालन होत असतांना पाहावयास मिळत आहे.प्रत्येकांनी घरीच राहवे यासाठी विविध माध्यमातून त्यांस प्रबोधन केले जात आहे.मात्र काही अशी खोडसाळपणा करणारी व्यक्ती बाहेत जात असतांना पोलीस खात्याच्या संपर्कात आल्यास त्यास प्रसाद मिळत आहे.मात्र प्रत्येकांची नैतिक जाबाबदारी म्हणून घरीच राहावे असा सल्ला ग्रामपंचायत च्या माध्यमातून देत आहे.

 कोरोना विषाणू आटोक्यात येण्यासाठी काही दिवस जातील.मात्र त्यासाठीच आपण घरीच राहून आपले काम करा.कारण हा विषाणू आपल्या संपर्कात आल्यास त्यालाही त्याची लागण होवू शकते.या दृष्टीकोणातून प्रत्येकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.गोवोगावी तसेच शहरातील घरातील व्यक्तीने घराच्या बाहेर न पडण्याचे सल्ले देण्यात येत आहे.मात्र सर्वांनी त्यांचे पालन करावे यासाठी ग्रामपंचायत एक पाऊल पुढे टाकून समस्त नागरिकांची आरोग्याची काळजी घेत आहे.

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट