मुंबई

अल्प मुदत कर्ज नियमित भरणार्‍या शेतकर्‍यांना  कर्ज परतफेड ची मुदत वाढवावी,अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतातील 60 टक्के लोक शेती व्यवसाय व शेतीला पूरक असणार्‍या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी हा शेती  व्यवसाय करण्यासाठी विविध सहकारी सोसायटी तसेच विविध सहकारी बँकेच्या माध्यमातून अल्प मुदत कर्ज घेत असतात. महविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये माफ करण्याच्या निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता परंतु देशांवर करोना या महाभयंकर रोगाने घाला घातल्याने पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे  या संचारबंदी मुळे आणि देशावर आलेले करोना चे सावट यामुळे नियमित अल्पमुदत कर्ज फेडणार्‍या शेतकरी साठी कर्ज फेडण्यासाठी ची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

 महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी हे ऑनलाईन पद्धतीने अल्पमुदत कर्जाची फेड करू शकत नाही तसेच नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांकडे पैसे असूनही ते संचारबंदी लागू केल्याने बँकेत जाऊन भरू शकत नाहीत त्यामुळे राज्य शासनाने नियमित कर्ज फेड करण्यार्‍या शेतकर्‍यांना महाविकास आघाडीने 50 हजार माफ करण्याचा निर्णय घेऊन ही नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे तरी राज्य शासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन नियमित अल्प मुदत कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी कर्जाची रक्कम भरण्यासाठी 30 जून 2020 पर्यंत मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार  जयंत पाटील यांनी केली आहे

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध