मुंबई

राज्यातील कोरोनाची धास्ती अजूनही खंडित झालेली नाही.उलट कोरोनाग्रस्तबाधितांची संख्या वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्या धास्तीतच राज्यात बुधवारी गुढीपाडवा कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.दरवर्षी या दिवशी विविध क्षेत्रात होणारी कोट्यवधींची उलाढाल यानिमित्ताने पूर्णपणे ठप्प झाली होती.दरम्यान राज्यातील  कोरोनाग्रस्तांची  संख्या 117 वर पोहोचली आहे.तर सांगलीत कुटुंबातील पाचजणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने ही साथ आता हातपाय पसरु लागली आहे.असे घडत असतानाच कोरोना झालेल्या त्या पहिल्या दाम्पत्यास गुढीपाडव्याच्या दिवशीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईच चार नवे रुग्ण

  कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चार नवे कोरोनाग्रस्त रूग्ण मुंबईत सापडले असून आता राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पोहचली 117 वर  पोहोचली आहे. मुंबईत एकूण कोरोना रूग्ण 45 कोरोनाबाधित सापडले आहेत. मुंबईत रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.  सांगतील एका कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 117 वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्र राज्यात असल्याची माहिती आहे.

राज्यातील पहिले करोनाग्रस्त

दाम्पत्य कोरोनामुक्त; डिस्चार्ज

पुणे: गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील पहिले करोनाग्रस्त दाम्पत्य अवघ्या 14 दिवसांतच करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे या दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे दाम्पत्य दुबईहून आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना करोना झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्यांना 9 मार्च रोजी नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना विलगीकरण कक्षातही ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या 24 तासात त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला असून या दाम्पत्याला डिस्चार्ज दिला आहे. डिस्चार्ज झाल्यानंतर या दाम्पत्याचा रुग्णालय प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.  तसेच इतर आठ रुग्णही बरे झाले असून त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तामिळनाडूत करोनाचा पहिला बळी;

मदुराई: करोनामुळे तामिळनाडूत एकाचा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील करोनामुळे दगावणार्‍यांचा आकडा 11वर पोहोचला आहे.  मदुराई येथील राजाजी रुग्णालयात या 54 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 23 मार्च रोजी त्याला राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या आले होते. मात्र त्याने उपचाराला साथ दिली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला मधूमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्यामुळे त्याची प्रकृती वारंवार खालावत गेल्याने सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण परदेशातून आला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध