कर्जत  

  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजना आखण्यात  आल्या आहेत, महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे, घरातच बसल्याने कोरोना विषाणूवर मात करू शकतो त्यामुळे सर्वत्र बंद आहे, आवश्यक सेवा म्हणून मेडिकल स्टोअर्स उघडी ठेवली आहेत मात्र स्टॉकिस्ट यांच्याकडून औषधे येत नसल्याने औषधांचा आताच तुटवडा भासू लागला आहे.

 बंद काळात आवश्यक जीवनाश्यक वस्तूची दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत त्यामध्ये किराणा दुकान, भाजी दुकान, दूध डेअरी आणि मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश आहे. कर्जत, कडाव, कशेळे, कळंब, माथेरान, नेरळ, डिकसळ अशी तालुक्यात सुमारे 98 मेडिकल स्टोअर्स आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉकिस्ट आहेत त्यांच्याकडून रोज वेगवेगळ्या कंपनीची औषधे येतच असतात मात्र आता दळणवळण यंत्रणा बंद असल्याने त्याचा परिणाम झाला आहे, स्टॉकिस्ट कडून माल येत नसल्याने औषधांचा तुटवडा जाणवून लागला आहे असे कर्जत तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे अध्यक्ष शेखर बोराडे यांनी सांगितले.

  याबाबत मेडिकल स्टोअर्स चे मालक स्टॉकिस्ट वाल्यांशी बोलले तेव्हा आमच्या कडे सध्या कर्मचारी वर्ग नसल्याने आम्ही औषधे पोहचवू शकत नसल्याचे सांगितले, यावर लवकर उपाय काढण्यात येईल असे कर्जत तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे अध्यक्ष शेखर बोराडे यांनी सांगितले सर्व दुकानदारांची औषधांची ऑर्डर घेऊन आम्ही स्वतः वाहन करून जाऊन औषधे आणण्याच्या विचारात आहोत मात्र त्यासाठी गाडीला व आम्हाला शासनाच्यावतीने तालुक्याचे अधिकारी तहसिलदार यांचे पत्र आणि परवानगी दिली तर ते शक्य आहे असे सांगितले. याबाबत आम्ही लवकर त्यांचीशी बोलणी करणार आहोत असे सांगितले.

  मेडिकल स्टोअर्स सांभाळणारे सुद्धा नागरिक आहेत खबरदारी म्हणून सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यत दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय कर्जत तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी घेतला आहे, कोणत्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या दुकानाबाहेर आमचे मोबाईल नंबर लिहून ठेवण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध