पंढरपूर 

 कोरोना चा सामना करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे आवाहन पंढरपूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी एका पत्रकाद्वारे केलेले आहे.

नगरपरिषद च्या वतीने आवाहन करताना त्यांनी सांगीतले की, आपल्या संपर्कातील , परिवारातील किंवा परिचयातील असणारे कोणत्याही व्यक्तीस खोकला,ताप(टेंपरेचर)  कोरोनाची लक्षण आढळली तर आशा व्यक्तीची  किंवा स्वतः ला अशी लक्षणे असतील तर याची माहिती नगरपरिषद प्रशासाना द्या. यामुळे आरोग्य विभागाला व शासनाला आपत कालीन यंत्रना राबवणे सोपे होईल.

पुणे , मुंबई , पिंपरी-चिंचवड, ईतर जिल्ह्यातुन किंवा परदेशातुन , आपल्या भागात, नागरिक आले असतील तर , त्या नागरिकांची माहिती नगरपरिषदेला कळवणे आवश्यक आहे. त्याचा आधार घेऊन आपण त्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहोत , त्या नागरिकांनी 14 दिवस त्याच घरात परिवारापासुन सुरक्षीत अंतर ठेऊन वावरणे महत्त्वाचे आहे.14 दिवस त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे तीतकेच महत्वाचे आहे त्यानंतर प्रकृती चांगली असेल तर त्यांना त्यांचे परिवार किंवा मात्र परिवारात वावरण्याच्या सुचना दिल्या जातील.असेही परदेशी यांनी सुचित केलेले आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध