नेरळ 

 कर्जत तालुक्यातील सावळा येथे 40 वर्षांपूर्वी फार्म हाऊस सोसायटी उभी राहिली. कदाचित कर्जत तालुक्यातील ती पहिली फार्म हाऊस सोसायटी असल्याचे बोलले जात असून त्या सोसायटी मध्ये त्या फार्म हाऊसचे बहुतेक मालक सध्या तेथे राहून आहेत.कोणी अज्ञात लोकांनी त्या सोसायटीची वीज तोडण्यात आली असून त्या ठिकाणी येणारे रस्ते बंद केले असून तेथील पाणी पुरवठा देखील बंद केला होता. दरम्यान,तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षक यांनी त्या ठिकाणी जाऊन पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था सुरळीत केली आहे.

सावळा येथील फार्म हाऊस सोसायटी कर्जत तालुक्यातील सर्वात जुनी फार्म हाऊस सोसायटी असून त्या ठिकाणी जवळपास 50 फार्म हाऊस आहेत.मुंबई मधील कवी, लेखक,पत्रकार,क्रिकेटर, उद्योजक असे नामांकित त्या फार्म हाऊस सोसायटी मध्ये विकेंडला येतात आणि राहतात.त्या फार्म हाऊस मध्ये काम करणारे सर्व कामगार हे जवळच्या सावळा आणि हेदवली गावातील तरुण काम करतात.ती फार्म हाऊस सोसायटी जुनी असल्याने आणि खालच्या बाजूने पेजनदी वाहत असून त्या ठिकाणी त्या फार्म हाऊस मालकांनी नळपाणी योजना तयार केली होती.त्या सोसायटी मध्ये मागील काही दिवसांपासून सोसायटी मध्ये त्या घरांचे मालक मुंबईत कोरोना ची लागण होऊ नये यासाठी येऊन राहिले आहेत.मात्र हीच बाब काही लोकांना खटकली असून त्यांनी त्या सर्व फार्म हाऊस मालक यांनी मुंबईत आपल्या घरी राहायला जावे असे देखील सूचित करण्याचा प्रयत्न केला.परंतु आपल्यापैकी कोणालाही कोरोना ची लागण झाली नसून आपण नेहमीप्रमाणे विश्रांती साठी येथे आलो असल्याचे सांगून तो विषय टाळत होते.

पण 24 मार्च च्या रात्री सावळा सोसायटीला येणारी वीज अज्ञात लोकांनी तोडून टाकली, त्याचवेळी त्या सोसायटीला येणारा नळपाणी पुरवठा देखील तोडून टाकण्यात आली.त्यानंतर तेथे येणारे रस्ते दगड टाकून अडवून टाकण्याचे काम अज्ञात लोकांनी केले आहेत.यामुळे तेथील फार्म हाऊस मालक घाबरून गेले असून त्या सोसायटी मध्ये फार्म हाऊस असलेले राज्यसभेचे माजी सदस्य असलेले जेष्ठ पत्रकार यांनी पोलिसांच्या कानावर ही माहिती दिली. त्यांनंतर आज 25 मार्च रोजी सकाळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर हे प्रशासन सोबत घेऊन सावळा येथे पोहचले.तेथे त्यांनी सर्व फार्महाऊस मध्ये फिरून आपल्यासोबत असलेल्या आरोग्य पथकाकडून तपासणी करून घेतली.साधारण 15 फार्महाऊस मध्ये येऊन राहणारे यांच्यापैकी एकालाही कोरोना चा संसर्ग झाला नाही हे सिद्ध होताच तहसीलदार यांनी सावळा गावातील जेष्ठ लोकांना तेथे बोलावून घेत त्यांना फार्म हाऊस मध्ये राहणारे यांच्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.त्यांनतर फार्म हाऊसची कापलेली वीज पुन्हा जोडण्यात आली,तसेच नळपाणी योजना सुरू करण्यात आली असून रस्त्यावर टाकलेले दगड बाजूला काढले आहेत.त्यामुळे काल पासून अडचणीत आलेले सावळा फार्म हाऊस सोसायटी मधील लोक निर्धास्त झाले आहेत.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध