श्रीवर्धन  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये.   सर्व राज्यात कलम 144 लागू केले आहे. ज्या ठिकाणी 5 व त्यापेक्षा जास्त लोक जमलेले आढळतील त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येईल याची दक्षता घ्यावी,असे आवाहन श्रीवर्धन पोलिसांतर्फे जनतेला करण्यात आलेले आहे.

 तसेच सर्व भाजीवाले, किराणा दुकानवाले, दुधवाले अगर इतर  अशा ज्यांना शासनातर्फे सवलत देण्यात आली आहे त्यांना पोलीस स्टेशनतर्फे असे  आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी दररोज स. 7 ते दुपारी 12 वा. पर्यंत तसेच सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवावीत जेणेकरून कोरोनाचा वाढता प्रभाव कमी होईल आणि जी परिस्थिती देशात आणि राज्यात चालू आहे त्यावर मात करता येईल. याकरिता सर्वांनी एकजूट होऊन सहकार्य करावे अशी विनंती श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आली आहे. 

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध