केप टाऊन 

कोरोनामुळे सार्‍या जगात हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका फक्त सामन्यांना नाही तर बॉलिवूड आणि क्रीडाविश्‍वालाही बसला आहे. यातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायिक कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. कनिका एका पार्टीत उपस्थित होती. त्यामुळं तिच्यावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र, आता कनिकामुळे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ अडचणीत आला आहे.

कनिका लखनऊमध्ये एका पार्टीमध्ये उपस्थित होती. या पार्टीत अनेक राजकीय नेते मंडळीही सामील होते. मात्र, कनिका ज्या हॉटेलमध्ये स्थायिक होती, तेथेच आफ्रिकेचा संघही होता. त्यामुळं त्यांना आता दुसर्‍यांदा क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. याआधी भारत-दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंना क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. आता कनिका कपूरमुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चिंता वाढली आहे.

याआधी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे ही मालिका रद्द झाली. त्यानंतर आफ्रिकेचा संघ मायदेशी परतला. सध्या कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत.

बॉलिवूडची बेबी डॉल गायिका कनिका कपूर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध