मेलबर्न 

कोरोना व्हायरसच्या जलद प्रसारामुळे ऑस्ट्रेलियातील ए लीग फुटबॉल स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी रद्द केल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल फेडरेशनने हा निर्णय एकमताने घेतला आहे.

ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी विदेशी प्रवाशांवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सरहद्दीवर जनतेसाठी वैद्यकीय तपासणी कक्ष उघडण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व प्रमुख क्रीडा स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन शासनाने घेतला आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध