लंडन

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया अर्सेनेल क्लबने आपल्या फुटबॉलपटूंसाठी मंगळवारपासून सुरू करण्यात येणारे प्रशिक्षण शिबीर कोरोना व्हायरस प्रसारामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संघातील खेळाडूंना 14 दिवसांच्या कालावधीसाठी विलगीकरण कक्षात राहण्याचा आदेश दिला आहे. दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर अर्सेनेलच्या फुटबॉलपटूंना त्यांना आपल्या घरी सुखरूप राहण्याचा आदेशही बजावला आहे.

अर्सेनेल संघाचे व्यवस्थापक मिकेल आर्टेटा यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने या क्लबने आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. 30 एप्रिलपर्यंत प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध