नियॉन 

पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, मे महिन्यात आयोजित चॅम्पियन्स लीग, युरोप लीग व महिला चॅम्पियन्स लीग फायनल्स आणखी लांबणीवर टाकण्याचा निर्णय युफा कार्यकारिणीने घेतला. सध्याच्या घडीला त्यांनी ही स्पर्धा पुन्हा केव्हा घेतली जाईल, हे जाहीर करणे टाळले आहे.

युरोपियन फुटबॉल कार्यकारिणीने यापूर्वीच स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. पुढील सूचना येईतोवर हा आदेश लागू असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मागील आठवड्यात स्थापन केलेल्या खास समितीने युरोपियन फुटबॉलशी संलग्न सर्व घटकांशी चर्चा केली. युफाचे अध्यक्ष अलेक्झांडर सेफेरिन त्या बैठकीला उपस्थित होते. उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार, विश्‍लेषण करण्याचा निर्णय त्यात झाला, असे युफाने नंतर जारी केलेल्या पत्रकातून नमूद केले.

‘सदर समितीने नव्या तारखासाठी आतापासूनच चाचपणी सुरु केली आहे. कालांतराने त्याची अधिकृत घोषणा होईल’, असे त्यांनी यात नमूद केले. पुरुष गटातील 2020 चॅम्पियन्स लीग फायनल इस्तंबूलमधील अतातूर्क स्टेडियमवर दि. 30 मे रोजी खेळवली जाणे अपेक्षित असून, त्यापूर्वी तीन दिवसांआधी युरोपा लीग फायनल पॉलिश शहर ग्रॅडन्स्क येथे होणार आहे. महिला गटातील चॅम्पियन्स लीग फायनल यापूर्वी व्हिएन्नात खेळवली जाणार होती. पण, कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे हे सर्व सामने लांबणीवर टाकले गेले आहेत.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध