मुंबई  

भारतावर ओढवलेल्या करोनाच्या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात 15 एप्रिलपर्यंत तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची दूरगामी परिणाम करणारी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधताना केली.

ङ्गपुढचे 21 दिवस जिथं आहात तिथेच राहा आणि कुठल्याही स्थितीत घराबाहेर पडू नका, असे मोदी यांनी या संकटाचे गांभीर्यही पुन्हा एकदा अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाचे नागरिकांसह अनेक सेलिब्रिटींनी स्वागत केले आहे. या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

सुमीत राघवन, अनुपम खेर, तापसी पन्नू, रेणुका शहाणे, रंगोली चंडेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून 21 दिवस लॉकडाऊनला पाठिंबा दिला आहे. ङ्गइतका मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागतेफ असं गायक-संगीतकार विशाल दादलानी यानं म्हटले आहे.

21 दिवस आपल्या आयुष्यापेक्षा जास्त नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याकडे सेलिब्रेशनसाठी नक्कीच कारण असेल, असे अभिनेत्री तापसी पन्नू हिने म्हटले आहे. अभिनेत्री रेणूका शहाणेनेदेखील या निर्णयाला पाठींबा दिला आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध