केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी शेतकर्‍यांना दिलासा देताना माहिती दिली की, ज्या शेतकर्‍यांच्या पिकाचे हवामान व आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, त्याचे आकलन सॅटलाइटने होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकेल, ,सोबतच पिकांच्या उत्पादनातदेखील पारदर्शकता येईल.

या तंत्रज्ञानाने शेतकर्‍यांच्या पिकाच्या नुकसानीचे आकलन होईल व यामध्ये शेतकर्यांना तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. जर पटवारी आकलन करताना काही गडबड झाली किंवा शेतीला त्यात समावेश करत नसेल, तर त्याचा अहवाल सरकारपर्यंत पोहोचेल. या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळू शकते. हे तंत्रज्ञान पायलट प्रकल्पांतर्गत काम करत आहेत. याची सुरूवात देशातील 10 राज्यांतील कमीत कमी 96 जिल्ह्यांमध्ये झाली आहे.

अवश्य वाचा