शेतकर्‍यांसाठी सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. जे किंमतींबाबत ग्राहकांना अलर्ट करेल. या पोर्टलची सुरुवात अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केली. या पोर्टलच्या मदतीने पुढील तीन महिन्यांच्या घाऊक किंमतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. पोर्टलवर सध्या सध्या बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या संभाव्य किंमतींची माहिती देण्यात आली आहे. परंतु आगामी काळात इतर भाज्यांचादेखील यामध्ये समावेश करणार आहे. एवढेच नाही, तर दर घसरण्याच्या स्थितीबाबतदेखील हे पोर्टल शेतकर्यांना सतर्क करणार आहे. नाफेडने हे पोर्टल तयार केले आहे. ज्याचे नाव ङ्गबाजार बुद्धिमत्ता एवं अग्रिम चेतावनी प्रणालीफ ठेवले आहे. याचे नाव एमआईईडब्ल्यूएस (ाळशुी) आहे. अ‍ॅग्रीव्हॉच या

खासगी कंपनीच्या देखरेखीखाली 1,200 बाजारपेठांचे आकडे सांगण्यात हे पोर्टल सक्षम आहे. बाजारपेठांचे भाव कित्येक वेळा अचानक घसरतात. जसे की, हवामान खराब असले की, बाजारपेठेतील भावदेखील पडतात. हे भाव घसरले की शेतकर्‍यांचे नुकसान होते. अशा स्थितीत हे पोर्टल शेतकर्‍यांना तीन महिन्यापूर्वीच बाजारभाव सांगण्यास मदत करेल.

 

अवश्य वाचा