कधी-कधी काही आनंद हे क्षणभंगूर  ठरतात. एखादा उपग्रह अवकाशात झेपावल्याने आनंदाने टाळ्या पिटत असताना काही क्षणात आपल्या डोळ्यासमोर त्याचा स्फोट व्हावा यासारखे दुसरे दुःख नाही. अशीच एक अत्यंत वेगळ्या प्रकारची घटना 11 जुलै, 1987 रोजी घडली. त्या दिवशी जन्माला आलेले एक मुल बेरजेस धरता जगाची लोकसंख्या बरोबर 500 कोटी झाली. जगाची लोकसंख्या 500 कोटीवर नेणार्‍या बालकाचे कौतुकही झाले. पण, त्याच बरोबर वाढत्या लोकसंख्येच्या दुष्परिणामांची जाणीवही तज्ज्ञांनी करून दिली. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिन ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून घोषित केला. दरवर्षी 11 जुलै रोजी लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून लोकसंख्या नियंत्रणावर भर दिला जातो, असे असले तरीही त्याचा म्हणावा तसा परिणाम जगावर आणि हिंदुस्थानावर तर मुळीच झाला नाही. फ्रान्ससारख्या प्रगतशील देशात जास्त मुलांना जन्म देणार्‍या मतांचा गौरव केला जातो. हे असेच चालू राहिले तर, ज्या प्रेमाने प्रचीन काळी  डायनासोर एकमेकांना खाऊन उपजीविका करत होते. आजही मासे माशांनाच खाऊन उपजीविका करतात, तीच वेळ माणसांवरही येईल. माणसेच माणसांना खातील. जगाची लोकसंख्या इ.स. 1800 साली एक अब्ज होती. आज ती सहा अब्जावर पोहोचली आहे. असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. लोकसंख्या जरी 19 अब्जावर पोहोचली तरी नैसर्गिक साधनसंपत्ती तर कमीच होणार आहे आणि या एवढ्या लोकांना अन्नधान्याचा प्रश्‍न कसा सुटेल आणि लोक कसे जगतील याची कल्पनाही करवत नाही. 

लोकसंख्या वाढीची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मृत्यूच्या प्रमाणात झालेली घट. पूर्वी औषधाच्या सुविधांच्या  अभावी जगभरातील लाखो बालके मृत्युमुखी पडत. या शिवाय पूर, दुष्काळ, भूकंप यातही माणसे मृत्युमुखी पडत. युद्धे, महायुद्धे होत, त्यात तर कोटी कोटी लोक मृत्युमुखी पडत. परिणामी, लोकसंख्यावाढीचा वेग आपोआप नियंत्रित होत होता. परंतु, हल्ली युध्ये होत नाहीत त्यात मृत्यूचे प्रमाण झपाट्याने घटले. दुष्काळाची झळ पोहोचत नाही. परिणामी, लोकसंख्या वाढीपैकी 97 टक्के लोकसंख्या वाढ ही हिंदुस्थानसारख्या अविकसित राष्ट्रांमध्ये होते. आशियात दरवर्षी पाच कोटी दक्षिण आफ्रिकेत दोन कोटी, लॅटिन अमेरिकेत  80 लाखापर्यंत वाढ होते.

जगाच्या वाढत्या लोकसंख्येची आपल्याला चिंता आहे. पण, त्याचबरोबर हिंदुस्थानात लोकसंख्यावाढीचा जो महास्फोट होत आहे त्याची चिंता करणे गरजेचे आहे. असेच चालत राहिले तर हिंदुस्थानची लोकसंख्या 11 जुलै 2087 रोजी 500 कोटी होईल आणि तो दिवस खास भारताचा ‘लोकसंख्या विस्फोट दिन’ म्हणून आपल्याला साजरा करावा लागेल. नुकत्याच झालेल्या जनगणनेत भारताची लोकसंख्या एक अब्ज दोन कोटीच्या पुढे आहे. त्यातच मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वेग चिंताग्रस्त करणारा आहे. तेव्हा धर्म आणि राजकारण याची गल्लत न करता या देशाचा विकास कसा साधता येईल, असा विचार दोन्ही समाजाने केला पाहिजे. आज चीनची लोकसंख्या नियंत्रित आहे. चीनमध्ये एक जोडपे एक मुल हा कायदा सर्व धर्मियांसाठी सक्तीने राबविली जातो. आणखी काही वर्षांनी आपण चीनलाही लोकसंख्येत मागे टाकू. पण, हा क्षणभंगूर आनंद!

आज भारतात दरवर्षी 15 लाख झाडांची कत्तल वाढत्या लोकसंख्येला निवारा देण्यासाठी होत आहे. त्यातच वंशाचा दिवा तो पेटलाच पाहिजे म्हणून मुलाचा हट्ट स्वतःला सुशिक्षित समजणार्‍या समाजातही मोठ्या प्रमाणात आहे. आज शाळेत, महाविद्यालयात लोकसंख्या शिक्षण हा विषय सक्तीचा केला आहे. तेव्हा आज 11 जुलैच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयांतून छोट्या कुटुंबाचे महत्त्व भारतवासियांना समजून देण्याचे काम आजचे बालक आणि उद्याचे पालक असणार्‍या विद्यार्थ्यांस करावयाचे आहे. 

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...