राज्यातील करोनाबाधितांचा आकडा 52 वरुन 63 वर गेल्यानंतर  खा. शरद पवारांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना फोन केला आणि 20 मिनिटे त्यांनी चर्चा केली. करोना चाचणीसाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे.  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि परिस्थितीची माहिती दिली. राज्य सरकार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपकरणे देण्यासाठी तयार आहे, पण या वैद्यकीय महाविद्यालयांना करोना चाचणीची किट उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.

दहावीचा पेपर पुढे ढकलला

दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते 31 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. नवी तारीख 31 मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे

राष्ट्रपतीही चेकअप करणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील स्वत:चं चेकअप करुन घेणार आहेत. खासदार दुष्यंत सिंह यांच्यासोबतच्या भेटीनंतर राष्ट्रपती भवनमधील सूत्रांनी माहिती दिली आहे की, राष्ट्रपती देखील चेकअप करुन घेणार आहेत. या सोबतच राष्ट्रपतींचे इतर नियोजीत कार्यक्रम देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात जेव्हा नाश्तासाठी काही जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं तेव्हा खासदार दुष्यंत सिंह देखील उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे खासदार दुष्यंत सिंह कोरोना पॉजिटिव्ह आहेत. बॉलिवुडची गायिका कनिका कपूरच्या लखनऊ येथील एका पार्टीत ते सहभागी झाले होते.

मेगा ब्लॉक रद्द

मध्य रेल्वेचा रविवारचा मेगाब्लॉक रद्द, पण एकूण क्षमतेच्या 60 टक्के लोकल गाड्याच रुळावर धावणा र आहेत. रविवारी मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा बंद ठेवली जाणार आहे.कोकण रेल्वे सेवाही बंद राहणार आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध