भोपाळ  

ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. ज्योतिरादित्य समर्थक काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांना आता सोमवारी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विश्‍वादर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या डावपेचांकडे लक्ष लागलं आहे.

काँग्रेस 22 बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे राजीनामे सादर केले आहेत. हे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनीही स्वीकारले तर त्या आमदारांचे सदस्यत्व संपुष्टात येईल. विधानसभा अध्यक्षांनी 6 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सर्वांचे राजीनामे मंजूर केले तर बहुमतासाठी 104 आमदारांची आवश्यकता पडते. अशा वेळी भाजपने 104चा आकडा पूर्ण केल्यास कमलनाथ सरकार पडू शकते, असे सांगण्यात येते आहे. पण विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे फेटाळले तर पक्षाकडून त्यांना व्हिप जारी केला जाईल. यानुसार आमदारांना सभागृहात उपस्थित राहावं लागेल. तरीही आमदार सभागृहात उपस्थित राहिले नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध