नेरुळ  

नवी मुंबई भाजपला महाविकास आघाडीने आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे तीन नगरसेवक आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नगरसेविका सुरेखा नरबागे, नगरसेविका कविता आगोंडे आणि माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांनी शिवसेनेचा मार्ग निवडला आहे. आज सुरेखा नारबागे यांचे पती अशोक नरबागे, कविता आगोंडे यांचे वडील चंद्रकांत आगोंडे तसेच भोलानाथ ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. यावेळी एकनाथ शिंदे आणि विजय चौगले उपस्थित होते.  विद्यमान नगरसेविका या सोमवारी।आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत. नवी मुंबईतील राजकीय घडामोडीमुळे गणेश नाईक याची अडचण वाढली आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध