मुंबई 

आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी दि. 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 4, तर भाजपचे 3 उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी 2 तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीत घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपच्या मध्यप्रदेशातील डावपेचांचा परिणाम महाराष्ट्रात होणार नसल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध