पाली/बेणसे

बौध्द समाज युवा संघ -रायगड तसेच सुधागड तालुका बौद्धजन पंचायत -पाली आणि  दि पिपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने  रविवार दि. 1 मार्च रोजी सकाळी 10:30 ते सायं 5:00 वाजेपर्यंत आदर्श नेता  व कार्यकर्ता निर्माण प्रशिक्षण  तसेच व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह- पाली सुधागड येथे पार पडणार आहे.

 लिडरशीप व कम्युनेकेशन स्किल या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहून आपण आपल्यातील एक आदर्शवत सक्षम नेता तयार करावा  असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येकजण सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक ,सांस्कृतिक , राजकीय किंवा अन्य विविध क्षेत्रांत  मनुष्याच्या , प्राणीमात्राच्या , राष्ट्राच्या हिता करीता एक स्वयंसेवक म्हणून प्रामाणिकपणे कार्य करीत असतो,  अशावेळी प्रत्येकाने प्रतिस्पर्धीस विरोध न करता , त्यास दुषण न देता , टीका टिप्पणी न करता ,  त्याची कमजोरी दाखविण्यापेक्षा  तुमचा आदर्शवत चांगुलपणा समाजासमोर दाखवून ,  तुम्ही तुमच्यातील एक परिपक्व आदर्शवत लिडर घडवावे हा उद्देश ठेऊन कौशल्य जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला आहे.

लौकीकास्पद अधिक उठावदार , चांगल्यातील चांगले कार्यकर्ते व आदर्श  नेता बनण्यासाठी  हे शिबीर अत्यंत  उपयुक्त ठरणारे आहे. अशा  प्रकारचे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन  बड्या  इंडस्ट्रीज , राष्ट्रीय दर्जाच्या , जागतिक दर्जाच्या विविध संघटनाच्या कार्यकर्त्यासाठी किंवा त्यांच्या मॅनेजमेंट साठी  दिली जाते ,  अशा प्रशिक्षणाकरिता हजारो रुपयांची फी आकारली जाते . मात्र सुधागड तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी हे  अशा प्रकारे डिजिटल स्वरूपात प्रशिक्षण प्रथमच दिले जात आहे . या प्रशिक्षणाचा अधिकाधिकानी लाभ घ्यावा असे  आवाहन बौध्द समाज युवा संघ -रायगड, सुधागड तालुका बौध्दजन पंचायत -पाली, दि पिपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट,  यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा