रोहे 

     श्री क्षेत्र पाबळ-पेण येथे आज रविवार 1 मार्च ते शनिवार 7 मार्च या कालावधीत ज्ञानराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायणास मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला आहे.

      प.पू.सद्गुरूस्वामी तपो.गणेशनाथ महाराज यांच्या क्रुपार्शिवादाने तसेच दासबोधाचे मूळ जन्मस्थान विशेष संशोधित शिवथरघळ सुंदरमठ रामदास पठारचे प्रमुख संशोधक प.पू.सद्गुरूस्वामी तपो.अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार्‍या या सप्ताह सोहळ्यात दररोज पहाटे 5 ते 6 काकड आरती,स.6 ते 7 नित्यपाठ,9 ते 1 ज्ञानेश्‍वरी पारायण,1 वा.महाप्रसाद, दु.3 ते 5 ज्ञानेश्‍वरी वाचन,5 ते 6 प्रवचन,6 ते 7 हरिपाठ,8 ते 9 महाप्रसाद,रात्रौ.9 ते 11 किर्तनरूपी सेवा व तद्नंतर जागर भजन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

        गेल्या 39 वर्षांची अखंड यशस्वी परंपरेने संपन्न होणार्‍या या सप्ताह सोहळ्यात आज रविवार 1 मार्च सायं.5 ते 6 वा.ह.भ.प.निव्रुत्तीमहाराज शिंदे पाबळ यांचे प्रवचन तर रात्रौ.9 ते 11 वा.ह.भ.प भगवान महाराज शिंदे, आळंदी यांची किर्तनरुपी सेवा, 2 रोजी मार्च प्रवचन ह.भ प.गजानन महाराज कदम कोंडवी,किर्तनरुपी सेवा ज्ञानोबा महाराज शिंदे महाड,दि.3 मार्च प्रवचन ह.भ.प.बी.डी.कदम वरप,किर्तनरुपी सेवा जनार्दन महाराज शिंदे कोंडवी, दि.4 मार्च प्रवचन ह.भ.प नरेश महाराज जाधव जांभोशी,किर्तनरुपी सेवा ह.भ.प.महेश महाराज साळुंखे पाटणोली,5 मार्च ह.भ प.हनुमान महाराज नावले रेवाळी,किर्तनरुपी सेवा ह.भ प.किरण महाराज कुंभार पाली,6 मार्च प्रवचन ह.भ.प.पंडित महाराज शिंदे पाबळ,किर्तनरुपी सेवा ह.भ.प.तुकाराम महाराज गावडे मुंबई तर

         7 मार्च रोजी स.9 ते 10 या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी दिंडी ग्राम प्रदक्षिणा,10 ते 12 वा.ह.भ.प.तुकाराम महाराज गावडे यांचे काल्याचे किर्तनरुपी सेवा तद्नंतर ठिक 12 वा.महाप्रसाद आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.तर सप्ताहाचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, महिला मंडळ पाबळ तसेच सिद्धार्थ व गावदेवी मित्र मंडळ पाबळ अधिक मोलाचे सहकार्य करीत आहेत.

 

अवश्य वाचा