उरण

      रयत शिक्षण संस्थेचे,तु.ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवार 27 फेब्रुवारी आणि  शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2020 रोजी अनुक्रमे ङ्गमराठी राजभाषा दिनफ व  ङ्गराष्ट्रीय विज्ञान दिनफ साजरा करण्यात आला.

          ङ्गमराठी राजभाषा दिनफ हा कार्यक्रम इ.आठवी ङ्गबफच्या वर्गाने साजरा केला. जेष्ठ साहित्यकार,नाटककार,श्रेष्ठ कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे  पूजन संपन्न करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मराठीची महती सांगणारी कविता म्हटली तर काहींनी आपल्या भाषणातून मराठी दिनाची महती सांगितली. श्री.दिगंबर पाटील, सौ.जे.के.पाटील, सौ.साधना पाटील, सौ.आशा मांडवकर. श्री.एस.टी.म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेची थोरवी सांगितली.

         नोबेल पुरस्कार विजेते, थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांचा जन्मदिवस म्हणजेच 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात ङ्गराष्ट्रीय विज्ञान दिनफ म्हणून साजरा केला जातो. हा संपूर्ण आठवडा ङ्गविज्ञान सप्ताहफ म्हणून विद्यालयात राबविण्यात आला. ङ्गविज्ञान सप्ताहफ अंतर्गत विद्यालयातील विज्ञान शिक्षकांनी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन केले होते.यात पोस्टर मेकिंग,विज्ञान नाटिका,वादविवाद स्पर्धा,मॉडेल मेकिंग स्पर्धा,इ.उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण आठवडाभर प्रत्येक वर्गात हे विविध उपक्रम घेण्यात आले.

           शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2020 रोजी  याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.एम.एच.पाटील,पर्यवेक्षिका सौ.आशा मांडवकर, पर्यवेक्षक श्री.जी.सी.गोडगे आणि सर्व विज्ञान शिक्षक यांनी  सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रतीमापुजनानंतर अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे कार्य आणि त्यांचे शोध याविषयी माहिती आपल्या भाषणातून सांगितली.त्यांनतर काही विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्व सांगणार्‍या विज्ञान नाटिका सादर केल्या. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.आशा मांडवकर यांनी विज्ञानावर आधारित भारुड सादर केले.हा कार्यक्रम इ.आठवी ङ्गकफच्या वर्गाने सादर केला.

 

अवश्य वाचा