म्हसळा

म्हसळा येथील  कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला ,वाणिज्य व बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान  महाविद्यालयात तालुका विधी समिती श्रीवर्धन ,म्हसळा व वकिल संघटना श्रीवर्धन याच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी श्रीवर्धन न्यायालयाचे  न्यायाधीश  पी.जी.लंबे साहेब, अ‍ॅड. ए.ए.चौगुले,अँड. एम.व्ही ठोसर अ‍ॅड. जे.डी.तांबुटकर, अ‍ॅड.विठोबा पाटील अ‍ॅड. .मुकेश पाटील,  वैभव पवार,सहाय्यक गटविकासअधिकारी प्रदिप डोलारे, पांडे  त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.एन.राघवराव, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि  विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.  प्रा.आर.एस.माशाले आणि अँड.विठोबा पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाबाबतचे प्रस्ताविक सादर केले.यावेळी बोलताना  श्रीवर्धन न्यायालयाचे न्यायाधीश  पी.बी.लंबे साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ स्वतः पुरते न पाहता समाजाचा विचार करावा आणि आपण करत असलेल्या कृतीतून राष्ट्रहित साध्य होत आहे कि नाही याची जाणीव ठेवून आपले वर्तन असावे त्यासाठी विद्यार्थी असताना आपणास कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याबाबत विद्यार्थ्यांना माहीती दिली.

स्वदेश फौडेशन वैभव पंवार यांनी  पाणी जिरवा पाणी वाचवा याविषयावर मार्गदर्शन करताना कोकणात वनराई बंधार्‍याचे महत्त्व सांगितले  अ‍ॅड. ए.ए.चौगुले यांनी प्रदूषण मुक्त पाणीआणि हवा मिळविण्याचा अधिकार याविषयावर बोलताना त्यांनी प्रदूषणाची कारणे आणि प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना आणि प्रदूषण नियंत्रण कायदे याबाबत विद्यार्थ्यांना माहीती दिली. अ‍ॅड. एम व्ही ठोसर यांनी पिडीताना नुकसान भरपाई योजना याबाबत मार्गदर्शन केले.

अवश्य वाचा